29 नोव्हेंबर दिनविशेष
29 november dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

29 नोव्हेंबर दिनविशेष - घटना :

  • 1877 : थॉमस एडिसनने प्रथम फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले.
  • 1889 : बंगळुरूच्या लालबाग गार्डनमध्ये ‘ग्लास हाऊस’ची पायाभरणी करण्यात आली.
  • 1945 : युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.
  • 1963 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन कमिशनची नियुक्ती केली.
  • 1972 : अटारीने पोंग हा पहिला व्यावसायिकरित्या यशस्वी व्हिडिओ गेम रिलीज केला
  • 1996 : नोबेल पारितोषिक विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या मदर तेरेसा यांना त्यांच्या मूळ अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनरने सन्मानित करण्यात आले.
  • 1999 : नारायणगाव, महाराष्ट्र येथे जगातील सर्वात मोठ्या मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीचे उद्घाटन करण्यात आले.
  • 2000 : शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खान आणि घटम वादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना उस्ताद हाफिज अली खान मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2000 : दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला आणि बांगलादेशच्या ग्रामीण बँकेला गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • वरीलप्रमाणे 29 नोव्हेंबर दिनविशेष 29 november dinvishesh

29 नोव्हेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1803 : ‘क्रिस्चीयन डॉपलर’ – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1849 : ‘सर जॉन अँब्रोझ फ्लेमिंग’ – ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1869 : ‘अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर’ – समाजसेवक यांचा जन्म. (मृत्यू : 20 जानेवारी 1951)
  • 1874 : ‘अंतोनियो मोनिझ’ – नोबेल पारितोषिक विजेते सेरेब्रल एँजिओग्राफी तंत्राचे निर्माते यांचा जन्म.
  • 1907 : ‘गोपीनाथ तळवलकर’ – प्रसिद्ध लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 7 जून 2000)
  • 1908 : ‘एन. एस. क्रिश्नन’ – तमिळ चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
  • 1919 : ‘जोई वीडर’ – इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 23 मार्च 2013)
  • 1920 : ‘जोसेफ शेव्हर्स’ – स्पॅनडेक्सचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 1 सप्टेंबर 2014)
  • 1926 : ‘प्रभाकर नारायण पाध्ये’ – लेखक, पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑक्टोबर 1996)
  • 1932 : ‘जाक्स शिराक’ – फ्रान्सचे 32 वे राष्ट्रपती यांचा जन्म.
  • 1935 : ‘गुरबचन सिंग सलारिया’ – परमवीर चक्र प्राप्तकर्ता यांचा जन्म.
  • 1971 : ‘बिपलब कुमार देब’ – भारताच्या त्रिपुरा राज्याचे 10 वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1977 : ‘युनिस खान’ – पाकिस्तानी क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 29 नोव्हेंबर दिनविशेष 29 november dinvishesh

29 नोव्हेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1926 : ‘कृष्णाजी नारायण आठल्ये’ – ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, केरळ कोकिळ या मासिकाचे संस्थापक व संपादक यांचे निधन.
  • 1939 : ‘माधव त्र्यंबक पटवर्धन’ – मराठी भाषेतील कवी आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 21 जानेवारी 1894)
  • 1950 : ‘बाया कर्वे’ – महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी यांचे निधन.
  • 1959 : ‘गोविंद सखाराम सरदेसाई’ – मराठी इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 17 मे 1865)
  • 1993 : ‘जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा’ – यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक यांचे निधन. (जन्म : 29 जुलै 1904)
  • 2001 : ‘जॉर्ज हॅरिसन’ – बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक यांचे निधन. (जन्म : 25 फेब्रुवारी 1943)
  • 2011 : ‘इंदिरा गोस्वामी’ – आसामी साहित्यिक व कवियत्री यांचे निधन.
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे, जि. धुळे

नोव्हेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
     12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
इतर पेज