14 जानेवारी दिनविशेष
14 january dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
जागतिक दिन :
- मराठा शौर्य दिन
14 जानेवारी दिनविशेष - घटना :
- 1761 : पानिपतची तिसरी लढाई मराठे आणि अफगाण यांच्यात झाली. दुसऱ्या दिवशी संपलेल्या युद्धात अफगाणांनी विजय मिळवला.
- 1809 : नेपोलियन बोनापार्टविरुद्ध इंग्लंड आणि स्पेन एकत्र आले.
- 1923 : विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
- 1948 : लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
- 1985 : हुन सेन यांची कंबोडियाच्या पंतप्रधानपदी निवड झाली.
- 1994 : मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करण्यात आले.
- 1998 : ज्येष्ठ गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
- 2000 : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांना 1999 साठी गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- 2005 : शनीच्या उपग्रह टायटनवर हायगेन्स प्रोब हे अंतराळयान उतरले.
- 2007 : नेपाळमध्ये अंतरिम राज्यघटना स्वीकारण्यात आली.
- वरीलप्रमाणे 14 जानेवारी दिनविशेष 14 january dinvishesh
14 जानेवारी दिनविशेष - जन्म :
- 1892 : ‘दिनकर बळवंत देवधर’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 24 ऑगस्ट 1993)
- 1896 : ‘डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख’ – भारताचे अर्थमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 2 ऑक्टोबर 1982)
- 1923 : ‘चित्तरंजन कोल्हटकर’ – अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑक्टोबर 2009)
- 1925 : ‘व्ही. कृष्णमूर्ती’ – पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक यांचा जन्म. (मृत्यू : 26 जून 2022)
- 1926 : ‘महाश्वेता देवी’ – पद्मविभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त, भारतीय बंगाली लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 28 जुलै 2016)
- 1942 : ‘योगेशकुमार सभरवाल’ – भारताचे 36वे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू : 3 जुलै 2015)
- 1977 : ‘नरेन कार्तिकेयन’ – भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर यांचा जन्म.
- 1998: ‘सलमान अली’ – भारतीय गायक यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 14 जानेवारी दिनविशेष 14 january dinvishesh
14 जानेवारी दिनविशेष - मृत्यू :
- 1742 : ‘एडमंड हॅले’ – धुमकेतू साठी प्रसिद्ध असलेले ब्रिटीश अंतरीक्षशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 8 नोव्हेंबर 1656)
- 1761 : ‘सदाशिवराव भाऊ’ – पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती यांचे निधन. (जन्म : 4 ऑगस्ट 1730)
- 1761 : ‘विश्वासराव’ – पानिपतच्या 3 र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांचे निधन. (जन्म : 2 मार्च 1742)
- 1898 : ‘लुईस कॅरोल’ – इंग्लिश लेखक आणि गणितज्ञ यांचे निधन.
- 1920 : ‘जॉन फ्रांसिस डॉज’ – डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 25 ऑक्टोबर 1864)
- 1991 : ‘चित्रगुप्त श्रीवास्तव’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म : 16 नोव्हेंबर 1917)
- 2001 : ‘फली बिलिमोरिया’ – माहितीपट निर्माते यांचे निधन.
14 जानेवारी दिनविशेष - जागतिक दिन लेख :
मराठा शौर्य दिन
पानिपत मराठा शौर्य दिन हा दिवस मराठा साम्राज्याच्या पराक्रमाला आणि त्यागाला सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. 14 जानेवारी 1761 रोजी घडलेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची आठवण म्हणून हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.
या लढाईत मराठा साम्राज्याने अफगाण शासक अहमदशहा अब्दालीच्या प्रचंड सैन्याविरुद्ध पराक्रमाने लढा दिला. जरी या युद्धात मराठ्यांना पराभव पत्करावा लागला, तरी त्यांच्या शौर्य, त्याग, आणि देशभक्तीची कथा आजही प्रेरणादायी आहे. हजारो मराठा सैनिकांनी मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण केले.
पानिपतची लढाई केवळ एका पराभवाची नव्हे तर देशभक्तीच्या उच्च आदर्शांची शिकवण देणारी घटना आहे. मराठा योद्ध्यांचे धैर्य, रणनीती, आणि बलिदान इतिहासात अमर आहे.
पानिपत मराठा शौर्य दिन हा दिवस मराठा परंपरेचा अभिमान आणि त्यागाच्या भावनेला उजाळा देतो. या दिवशी शौर्यगाथा स्मरण करून समाजातील ऐक्य आणि निष्ठा वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला जातो.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 14 जानेवारी रोजी मराठा शौर्य दिन असतो.