22 जानेवारी दिनविशेष
22 january dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
22 जानेवारी दिनविशेष - घटना :
- 1901 : राणी व्हिक्टोरियाच्या मृत्युनंतर, एडवर्ड सातवा इंग्लंडचा राजा झाला.
- 1924 : रॅमसे मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
- 1947 : भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.
- 1968 : अपोलो कार्यक्रम : अपोलो 5 ने पहिले चंद्र मॉड्यूल अवकाशात घेऊन उड्डाण केले.
- 1971 : सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे 13 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
- 1984 : संगणक माऊस आणि ग्राफिकल यूजर इंटरफेस लोकप्रिय करणारा पहिला ग्राहक संगणक, अॅपल मॅकिंटॉश सादर करण्यात आला.
- 1998 : अंतराळ शटल कार्यक्रम : रशियन अंतराळ स्थानकावर मीरशी जोडण्यासाठी एसटीएस-89 वर अंतराळ शटल एंडेव्हरचे प्रक्षेपण.
- 2001 : आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.
- 2024 : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भव्य उद्घाटन.
- वरीलप्रमाणे 22 जानेवारी दिनविशेष 22 january dinvishesh
22 जानेवारी दिनविशेष - जन्म :
- 1896 : ‘सुर्यकांत त्रिपाठी’ – कवी यांचा जन्म.
- 1909 : ‘यू. थांट’ – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस यांचा जन्म. (मृत्यू : 25 नोव्हेंबर 1974)
- 1911 : ‘अनिरुद्ध घनश्याम रेळे’ – मराठी लेखक यांचा जन्म.
- 1916 : ‘हरीलाल उपाध्याय’ – गुजराथी लेखक आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू : 15 जानेवारी 1994)
- 1916 : ‘सत्येन बोस’ – बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 9 जून 1993)
- 1920 : ‘प्रा. ह. श्री. शेणोलीकर’ – संतसाहित्याचे अभ्यासक यांचा जन्म.
- 1922 : ‘शांता बुध्दिसागर’ – मराठी लेखिका यांचा जन्म.
- 1934 : ‘विजय आनंद’ – हिंदी चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 23 फेब्रुवारी 2004)
- वरीलप्रमाणे 22 जानेवारी दिनविशेष 22 january dinvishesh
22 जानेवारी दिनविशेष - मृत्यू :
- 1297 : ‘योगी चांगदेव’ – यांनी समाधी घेतली.
- 1666 : ‘शहाजहान’ – 5 वे मुघल सम्राट यांचे आपल्याच मुलाच्या औरंगजेबच्या कैदेत 10 वर्षे राहिल्यानंतर निधन. (जन्म : 5 जानेवारी 1592)
- 1682 : ‘समर्थ रामदास स्वामी’ – यांचे निधन.
- 1900 : ‘डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस’ – मायक्रोफोनचे सहसंशोधक यांचे निधन.(जन्म : 16 मे 1831)
- 1901 : ‘राणी व्हिक्टोरिया’ – 63 वर्षे आणि 216 दिवस इंग्लंडवर राज्य करणारी इंग्लंडची राणी यांचे निधन. (जन्म : 24 मे 1819)
- 1967 : ‘डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे’ – क्रांतिकारक, दिद्वान, कृषितज्ज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार यांचे निधन. (जन्म : 7 नोव्हेंबर 1884)
- 1971 : ‘हॅरी एफ. गुगेनहेम’ – अमेरिकन उद्योगपती आणि प्रकाशक, न्यूजडेचे सह-संस्थापक यांचे निधन. (जन्म : 23 ऑगस्ट 1890)
- 1972 : ‘स्वामी रामानंद तीर्थ’ – राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन. (जन्म : 3 ऑक्टोबर 1903)
- 1973 : ‘लिंडन बी. जॉन्सन’ – अमेरिकेचे 36 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 27 ऑगस्ट 1908)
- 1975 : ‘धोंडो वासुदेव गद्रे’ – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी यांचे निधन. (जन्म : 16 नोव्हेंबर 1894)
- 1978 : ‘हर्बर्ट सटक्लिफ’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 24 नोव्हेंबर 1894)
- 1982 : ‘एडुआर्डो फ्री मॉन्टाल्वा’ – चिली देशाचे 28वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.(जन्म : 16 जानेवारी 1911)
- 2014 : ‘अक्किनेनी नागेश्वर राव’ – पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार,भारतीय अभिनेते आणि निर्माते यांचे निधन.(जन्म : 20 सप्टेंबर 1923)