30 जानेवारी दिनविशेष
30 january dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

30 जानेवारी दिनविशेष

जागतिक दिन :

  • महात्मा गांधी शहीद दिन

30 जानेवारी दिनविशेष - घटना :

  • 1933: अ‍ॅडॉल्फ हिटलर जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला.
  • 1989: अफगाणिस्तानातील काबूलमधील अमेरिकन दूतावास बंद करण्यात आला.
  • 1994: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.
  • 1995: सिकलसेल रोगासाठी हायड्रॉक्सीकार्बामाइड हे पहिले मंजूर प्रतिबंधात्मक उपचार बनले.
  • 1999: पण्डित रविशंकर यांना भारतरत्‍न जाहीर.
  • 2007: मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने विंडोज व्हिस्टा रिलीज केले, जी ऑपरेटिंग सिस्टम मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि एनटी आधारित कर्नलची एक प्रमुख आवृत्ती आहे.
  • 2013: नारो-1 हे दक्षिण कोरियाने प्रक्षेपित केलेले पहिले वाहक रॉकेट बनले.
  • 2020: जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 साथीला आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले.
  • वरीलप्रमाणे 30 जानेवारी दिनविशेष 30 january dinvishesh

30 जानेवारी दिनविशेष - जन्म :

  • 1882: ‘फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट’ -अमेरिकेचे 32 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 12 एप्रिल 1945)
  • 1910: ‘सी. सुब्रम्हण्यम’ – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल यांचा जन्म. (मृत्यू: 7 नोव्हेंबर 2000)
  • 1911: ‘पं. गजाननबुवा जोशी’ – शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू: 28 जून 1987)
  • 1917: ‘वामन दत्तात्रय पटवर्धन’ – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 27 जुलै 2007)
  • 1925: ‘डगलस एंगलबर्ट’ – कॉम्पुटर माउसचे शोधक यांचा जन्म. (मृत्यू : 2 जुलै 2013)
  • 1927: ‘ओलोफ पाल्मे’ – स्वीडनचे 26 वे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 28 फेब्रुवारी 1986)
  • 1927: ‘बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण’ – भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑगस्ट 2005)
  • 1929: ‘रमेश देव’ – हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1930: ‘समर बॅनर्जी’ – भारतीय ऑलिम्पिक फुटबॉलपटू यांचा जन्म.
  • 1949: ‘डॉ. सतीश आळेकर’ – नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते, थिएटर अ‍ॅकॅडमी चे एक संस्थापक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे संचालक, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 30 जानेवारी दिनविशेष 30 january dinvishesh

30 जानेवारी दिनविशेष - मृत्यू :

  • 1889: ‘रुडॉल्फ’ – ऑस्ट्रिया देशाचे क्राउन प्रिन्स, यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1858)
  • 1948: ‘महात्मा गांधी’ – यांची हत्या. (जन्म: 2 ऑक्टोबर 1869)
  • 1948: ‘ऑर्व्हिल राईट’ – भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते यांचे निधन. (जन्म: 19 ऑगस्ट 1871)
  • 1951: ‘फर्डिनांड पोर्श’ – ऑस्ट्रियन वाहन अभियंता यांचे निधन. (जन्म: 3 सप्टेंबर 1875)
  • 1968: ‘माखनलाल चतुर्वेदी’ – भारतीय पत्रकार, कवी आणि नाटककार, यांचे निधन. (जन्म: 4 एप्रिल 1889)
  • 1991: ‘जॉन बार्डीन’ – नोबेल पारितोषिक, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते यांचे निधन.(जन्म: 23 मे 1908)
  • 1996: ‘गोविंदराव पटवर्धन’ – हार्मोनियम व ऑर्गन वादक यांचे निधन.
  • 2000: ‘आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर’ – मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन.
  • 2004: ‘रमेश अणावकर’ – गीतकार यांचे निधन.
  • 2015: ‘झेलु झेलेव’ – बल्गेरिया देशाचे 2रे अध्यक्ष यांचे निधन.(जन्म: 3 मार्च 1935)

30 जानेवारी दिनविशेष - जागतिक दिन लेख :

महात्मा गांधी शहीद दिन

शहीद दिन हा भारतात दरवर्षी 30 जानेवारीला साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना सन्मानित करण्यासाठी पाळला जातो.

1948 मध्ये याच दिवशी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली. त्यांच्या त्यागाची आणि अहिंसेच्या विचारांची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. देशभरात या दिवशी दोन मिनिटांचे मौन पाळले जाते आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते.

फक्त महात्मा गांधीच नव्हे, तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांसारख्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपल्याला स्वातंत्र्य उपभोगता येते.

शहीद दिन आपल्याला देशप्रेम आणि कर्तव्यभावनेची जाणीव करून देतो. आपण सर्वांनी शहीदांचे बलिदान विसरू नये आणि त्यांच्या विचारांनुसार समाजहितासाठी कार्य करावे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

30 जानेवारी रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी शहीद दिन असतो.
जानेवारी दिनविशेष
सोमंबुगुशु
   1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930 31  
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज