31 जानेवारी दिनविशेष
31 january dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
31 जानेवारी दिनविशेष - घटना :
- 1911 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसऱ्यांदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेले ते एकमेव व्यक्ती आहेत.
- 1929 : सोव्हिएत रशियाने लिओन ट्रॉटस्कीला हद्दपार केले.
- 1949 : बडोदा आणि कोल्हापूर (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाले.
- 1950 : डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती म्हणून संसदेतील पहिले भाषण दिले.
- 1958 : अंतराळ शर्यत : पहिल्या यशस्वी अमेरिकन उपग्रहाने व्हॅन ऍलन रेडिएशन बेल्ट शोधला.
- 1971 : अपोलो 14 : अंतराळवीर अॅलन शेपर्ड, स्टुअर्ट रुसा आणि एडगर मिशेल, सॅटर्न व्ही यानातून, चंद्रावरील फ्रा मौरो हाईलँड्सच्या मोहिमेसाठी निघाले.
- 1992 : राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना
- वरीलप्रमाणे 31 जानेवारी दिनविशेष 31 january dinvishesh
31 जानेवारी दिनविशेष - जन्म :
- 1868 : ‘थिओडोर विल्यम रिचर्ड्स’ – नोबेल पुरस्कार विजेते, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू : 2 एप्रिल 1928)
- 1881 : ‘इरविंग लँगमुइर’ – नोबेल पुरस्कार विजेते, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू : 16 ऑगस्ट 1957)
- 1896 : ‘दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे’ – कन्नड कवी यांचा जन्म. (मृत्यू : 21 ऑक्टोबर 1981)
- 1923 : ‘मेजर सोमनाथ शर्मा’ – परमवीर चक्राचे पहिले मानकरी यांचा जन्म.
- 1931 : ‘गंगाधर महांबरे’ – गीतकार कवी व लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 23 डिसेंबर 2008)
- 1975 : ‘प्रीती झिंटा’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 31 जानेवारी दिनविशेष 31 january dinvishesh
31 जानेवारी दिनविशेष - मृत्यू :
- 1954 : ‘ई. एच. आर्मस्ट्राँग’ – एफ. एम. रेडिओचे संशोधक, अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता आणि शोधक यांचे निधन (जन्म : 18 डिसेंबर 1890)
- 1956 : ‘ए. ए. मिल्ने’ – इंग्रजी लेखक, विनी-द-पूह पुस्तकाचे प्रकाशक यांचे निधन (जन्म : 18 जानेवारी 1882)
- 1969 : ‘अवतार मेहर बाबा’ – भारतीय आध्यात्मिक गुरु यांचे निधन
- 1972 : ‘महेन्द्र’ नेपाळचे राजे यांचे निधन
- 1986 : ‘विश्वनाथ मोरे’ – संगीतकार यांचे निधन
- 1994 : ‘वसंत जोगळेकर’ – मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन
- 2000 : ‘वसंत कानेटकर’ – नाटककार यांचे निधन (जन्म : 20 मार्च 1920)
- 2000 : ‘के. एन. सिंग’ – हिंदी चित्रपटांतील गाजलेले खलनायक यांचे निधन (जन्म : 1 सप्टेंबर 1908)
- 2004 : ‘व्ही. जी. जोग’ – भारतीय व्हायोलिनवादक यांचे निधन (जन्म : 22 फेब्रुवारी 1922)
- 2004 : ‘सुरैय्या’ – गायिका व अभिनेत्री यांचे निधन (जन्म : 15 जून 1929)
- 2015 : ‘रिचर्ड वोन वेझसॅकर’ – जर्मनी देशाचे 6वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन (जन्म : 15 एप्रिल 1920)