17 जानेवारी दिनविशेष
17 january dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
17 जानेवारी दिनविशेष - घटना :
- 1773 : कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.
- 1899 : अमेरिकेने पॅसिफिक महासागरातील वेक आयलंडचा ताबा घेतला.
- 1912 : रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहोचले.
- 1945 : दुसरे महायुद्ध – रशियन सैन्याने पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.
- 1946 : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची पहिली बैठक झाली.
- 1956 : बेळगाव – कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्यासाठी घोषणा झाली.
- 2001 : अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.
- 2001 : कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.
- वरीलप्रमाणे 17 जानेवारी दिनविशेष 17 january dinvishesh
17 जानेवारी दिनविशेष - जन्म :
- 1888 : ‘बाबू गुलाबराय’ – भारतीय तत्त्वज्ञ आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 13 एप्रिल 1963)
- 1905 : ‘दत्तात्रय रामचंद्र कापरेकर’ – भारतीय गणितज्ञ यांचा जन्म.
- 1917 : ‘एम. जी. रामचंद्रन’ – तामिळनडुचे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 24 डिसेंबर 1987)
- 1923 : ‘रंगेया राघव’ भारतीय लेखक आणि नाटककार यांचा जन्म. (मृत्यू : 12 सप्टेंबर 1962)
- 1932 : ‘मधुकर केचे’ – साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 25 मार्च 1993)
- 1942 : ‘मुहम्मद अली’ – अमेरिकन मुष्टियोद्धा यांचा जन्म.
- 1945 : ‘जावेद अख्तर’ – भारतीय कवी, नाटककार आणि संगीतकार यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 17 जानेवारी दिनविशेष 17 january dinvishesh
17 जानेवारी दिनविशेष - मृत्यू :
- 395 : ‘थिओडोसियस आय’ – रोमन सम्राट यांचे निधन. (जन्म : 11 जानेवारी 347)
- 1556 : ‘हुमायून’ – दुसरा मुघल सम्राट यांचे निधन. (जन्म : 7 मार्च 1508)
- 1771 : ‘गोपाळराव पटवर्धन’ – पेशव्यांचे सरदार यांचे निधन.
- 1893 : ‘रदरफोर्ड बी. हेस’ – अमेरिकेचे 19वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 4 ऑक्टोबर 1822)
- 1922 : ‘जॉर्ज बी. सेल्डेन’ – ऑटोमोबाइलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट मिळवणारे संशोधक यांचे निधन. (जन्म : 14 सप्टेंबर 1846)
- 1951 : ‘ज्योती प्रसाद अग्रवाला’ – भारतीय कवी, नाटककार आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 17 जून 1903)
- 1961 : ‘लुमूंबा’ – काँगोचे पहिले पंतप्रधानपॅट्रिक यांचे निधन. (जन्म : 2 जुलै 1925)
- 1988 : ‘लीला मिश्रा’ – अभिनेत्री यांचे निधन.
- 1997 : ‘क्लाईड टॉम्बॉग’ – प्लूटो ग्रहाचे शोधक, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 4 फेब्रुवारी 1906)
- 2010 : ‘ज्योति बसू’ – प. बंगालचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 8 जुलै 1914)
- 2022 : ‘पंडित बिरजू महाराज’ – कथक नर्तक यांचे निधन.