23 मार्च दिनविशेष

23 मार्च दिनविशेष 23 March dinvishesh

आजचा दिनविशेष

जागतिक दिवस- घटना - जन्म - मृत्यू

23 मार्च दिनविशेष

23 मार्च दिनविशेष - जागतिक दिवस :

  • World Meterological Day – जागतिक हवामान दिवस

  • शहीद दिवस

23 march dinvishesh

23 मार्च दिनविशेष - घटना :

  • 1839 : बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ. के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग झाला.
  • 1857 : न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली.
  • 1868 : कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना झाली.
  • 1919 : बेनिटो मुसोलिनी यांनी मिलान इटली मध्ये हुकूमशाही राजकीय चळवळ सुरूकेली.
  • 1931 : भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
  • 1940 : संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत.
  • 1956 : पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.
  • 1980 : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा प्रकाश पदुकोन यांनी पहिले भारतीय म्हणून जिंकली.
  • 1998 : अभिनेते दिलीपकुमार यांना निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.
  • 1999 : पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविेण्यात आले.
  • 1999 : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला.
  • 2001 : रशियाचे मिर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळले, त्याचे तुकडे फिजी जवळ प्रशांत महासागरात पडले.

23 मार्च दिनविशेष - जन्म :

  • 1699 : ‘जॉन बार्ट्राम’ – अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1749 : ‘पिएर सिमॉन दि लाप्लास’ – फ्रेंच गणितज्ञ यांचा जन्म.
  • 1881 : ‘रॉजर मार्टिन दु गार्ड’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक यांचा जन्म.
  • 1881 : ‘हेर्मान स्टॉडिंगर’ – नोबेल विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1883 : ‘मंजेश्वर गोविंद पै’ तथा राष्ट्रकवी ‘गोविंद पै’ – कन्‍नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 6 सप्टेंबर 1963)
  • 1893 : ‘गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू’ – भारतीय व्यापारी यांचा जन्म. (मृत्यू: 4 जानेवारी 1974)
  • 1898 : ‘नलिनीबाला देवी’ – आसामी कवयित्री आणि लेखिका यांचा जन्म. (मृत्यू: 24 डिसेंबर 1977)
  • 1910 : ‘डॉ. राममनोहर लोहिया’ – समाजवादी नेते आणि विख्यात संसदपटू यांचा जन्म. (मृत्यू: 12 ऑक्टोबर 1967)
  • 1912 : ‘वर्नर फॉन ब्रॉन’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते यांचा जन्म.
  • 1916 : ‘हरकिशन सिंग सुरजित’ – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य यांचा जन्म. (मृत्यू: 1 ऑगस्ट 2008)
  • 1923 : ‘हेमू कलाणी’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 21 जानेवारी 1943)
  • 1929 : ‘गोविंद स्वरूप’ – भारतीय रेडीओ खगोलशास्त्रज्ञ (निधन: 7 सप्टेंबर 2020)
  • 1931 : ‘व्हिक्टर कॉर्चनॉय’ – रशियन बुद्धीबळपटू यांचा जन्म.
  • 1953 : ‘किरण मुजुमदार-शॉ’ – भारतीय महिला उद्योजक यांचा जन्म.
  • 1954 : ‘केनेथ कोल’ – अमेरिकन फॅशन डिझायनर केनेथ कोल प्रॉडक्शन चे स्थापक यांचा जन्म.
  • 1968 : ‘माईक अ‍ॅथरटन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1976 : ‘स्मृती इराणी’ – भारतीय अभिनेत्री, निर्माता आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1987 : ‘कंगना रणावत’ – अभिनेत्री यांचा जन्म.

23 मार्च दिनविशेष - मृत्यू :

  • 1931 : क्रांतिकारक भगत सिंग यांना फाशी. (जन्म: 28 सप्टेंबर 1907)
  • 1931 : क्रांतिकारक सुखदेव थापर यांना फाशी. (जन्म: 15 मे 1907)
  • 1931 : क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांना फाशी. (जन्म: 24 ऑगस्ट 1908)
  • 1991 : व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक प्रकाश सिंग यांचे निधन. (जन्म: 31 मार्च 1913)
  • 2007 : मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन.
  • 2008 : मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील यांचे निधन.
  • 2011 : ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचे निधन. (जन्म: 27 फेब्रुवारी 1932)
  • 2014 : अदोल्फो सुआरेझ गोन्झालेझ – स्पेनचे पहिले प्रधानमंत्री (जन्म 25 सप्टेंबर 1932)
  • 2015 : ‘ली कुआन यी’ – सिंगापुरचे पहिले प्रधानमंत्री ( जन्म 16 सप्टेंबर 1923)
  • 2022 : ‘रमेशचंद्र लाहोटी’ – भारताचे 35 वे सरन्यायाधीश (जन्म 1 नोव्हेंबर 1940)

जागतिक हवामान दिन

जागतिक हवामान दिन हा हवामानाच्या महत्त्वाबद्दल जागरुकता आणि लक्ष वेधण्याचे कार्य करतो.

18व्या आणि 19व्या शतकापर्यंत या विषयाची प्रगती लक्षणीय नसली तरी पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास हा हजारो वर्षांपासून शास्त्रज्ञांना आकर्षित करणारा विषय होता. ‘हवामान निरीक्षणचे’ कार्य विकसित होण्यास सुरुवात झाली आणि 20 व्या शतकात संगणक आल्यामुळे हवामानशास्त्रातील प्रगती खूप वेगाने वाढली.

1873 मध्ये, पृथ्वीच्या वातावरणाच्या विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यां वैज्ञानिकांना भौगोलिक स्थानांमधील माहिती सरकारी खात्याशी सामायिक करण्यासाठी व वैज्ञानिकांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय हवामान संघटना’ स्थापन करण्यात आली. वर्षानुवर्षे वैज्ञानिक शोध जसजसे वाढत गेले, तसतसे लोकांना हे माहित होत गेले की देश किंवा सीमांच्या पलीकडे एकमेकांचा सहयोग आवश्यक आहे.

23 मार्च 1950 रोजी ‘जागतिक हवामान संघटनेने’ हा दिवस ‘जागतिक हवामान दिवस’ साजरी करण्यास सुरुवात केली. 70 वर्षांहून अधिक काळापासून, ‘जागतिक हवामान संघटना’ ‘संयुक्त राष्ट्रांची’ (UN) एक विशेष संस्था आहे, जी सहकार्यासाठी तसेच देशांमधील समन्वय घडवून आणण्यास समर्पित आहे.

'मीर अंतराळ स्थानक'

हे अंतराळ स्थानक प्रथम सोव्हिएत युनियनच्या मालकीचे आणि नंतर रशियाद्वारे चालवले गेले. ह्या अंतराळ स्थानकाने सन 1986 ते 2001 पर्यंत काम केले. ते पृथ्वीभोवती खालच्या कक्षेत (Lower Orbit) फिरले.

ह्या स्थानकाचे छोटे छोटे भाग अंतराळात घेऊन जाऊन या तुकड्यांमध्ये बांधलेले मीर हे पहिले स्टेशन होते. 1986 ते 1996 पर्यंत ते कक्षेत एकत्र आले. हे स्थानक पूर्वीच्या कोणत्याही अंतराळयानापेक्षा जास्त मोठे होते. सध्या, ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक’ (ISS) हे पृथ्वीभोवती फिरणारे सर्वात मोठे कृत्रिम उपग्रह आहे. मीर टीमने आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जीवशास्त्र, मानवी जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, हवामानशास्त्र आणि अवकाशयान प्रणालींमध्ये प्रयोग आणि संशोधन केले. या अंतराळ स्थानकात तीन अंतराळवीरांच्या राहण्याची सोय होती.

अंतराळात एक दशकाहून अधिक काळ झीज होऊनही, 1997 पर्यंत स्टेशन आश्चर्यकारकपणे चांगले काम करत होते, परंतु काही वर्षानंतर या अंतराळ स्थानकावर अचानकपने संगणकीय खराबी आल्यामुळे त्यास पृथ्वीवर प्रशांत महासागरामध्ये पाडण्यात आले.