24 मार्च दिनविशेष
24 मार्च दिनविशेष 24 March dinvishesh
आजचा दिनविशेष
जागतिक दिवस- घटना - जन्म - मृत्यू
24 मार्च दिनविशेष - जागतिक दिवस / सण :
- World Tuberculosis Day जागतिक क्षयरोग दिन
- सण उत्सव : होळी
24 मार्च दिनविशेष - घटना :
- 1677 : दक्षिण दिग्विजय मोहिमेच्यावेळी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.
- 1836: कॅनडाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.
- 1855 : आग्रा आणि कलकत्ता शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
- 1883 : शिकागो आणि न्यूयॉर्क यांच्यात पहिले दूरध्वनी संभाषण झाले.
- 1896 : ए.एस. पोपोव्हने इतिहासात प्रथमच रेडिओ सिग्नल प्रसारित केला.
- 1923 : ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.
- 1929 : लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.
- 1962 : जागतिक क्षय रोग दिन
- 1977 : मोरारजी देसाई यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.
- 1993: धूमकेतू शूमाकर-लेव्ही-9 चा शोध लागला. हा धूमकेतू जुलै महिन्यात गुरू ग्रहावर आदळला होता.
- 1998 : टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी 11 ऑस्कर पुरस्कार मिळाले.
- 2008: भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले आणि प्रथमच निवडणुका झाल्या.
- 1962 : जागतिक क्षयरोग दिन
24 मार्च दिनविशेष - जन्म :
- 1775 : ‘मुथुस्वामी दीक्षीतार’ – तामिळ कवी व संगीतकार यांचा जन्म.
- 1901 : ‘अनब्लॉक आय्व्रेक्स’ – अमेरिकन अॅनिमेटर मिकी माऊस चे सह निर्माते यांचा जन्म.
- 1951 : ‘टॉमी हिल्फिगर’ – अमेरिकन फॅशन डिझायनर यांचा जन्म.
- 1984 : ‘एड्रियन डिसूझा’ – भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म.
- 1979 : ‘इमरान हाशमी’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्मदिन.
- 1984 : ‘एड्रियन डिसूझा’ – भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म.
24 मार्च दिनविशेष - मृत्यू :
- 1603 : ‘एलिझाबेथ पहिली’ – इंग्लंडची व आयर्लंडची राणी
- 1849 : ‘योहान वुल्फगँग डोबेरायनर’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 13 डिसेंबर 1780)
- 1882 : ‘एच. डब्ल्यू. लाँगफेलो’ – अमेरिकन नाटककार व कवी यांचे निधन. (जन्म: 27 फेब्रुवारी 1807)
- 1905 : ‘ज्यूल्स व्हर्न’ – फ्रेन्च लेखक यांचे निधन. (जन्म: 8 फेब्रुवारी 1828)
- 2007 : ‘श्रीपाद नारायण पेंडसे’ – मराठी कथालेखक व कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 5 जानेवारी 1913)
World Tuberculosis Day जागतिक क्षयरोग दिन :
जागतिक क्षयरोग दिन जो 24 मार्च रोजी असतो, हा दिवस जागतिक आव्हानावर लक्ष केंद्रित करतो जो दरवर्षी लाखो लोकांना प्रभावित करतो, हा दिवस डॉ.रॉबर्ट कोच यांच्या 1882 मध्ये क्षयरोग (टीबी) ला कारणीभूत असलेल्या जिवाणूच्या शोधाच्या निमित्त साजरा केला जातो. जागतिक क्षयरोग दिन, एक दिवस आहे जो लोकांना एकत्र आणतो, क्षयरोगाच्या प्रभावाबद्दल आणि त्यावर मात करण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांबद्दल जागरूकता वाढवतो.
वैद्यकशास्त्रात प्रगती असूनही, क्षयरोग हा अजूनही एक महत्त्वाचा धोका आहे, विशेषत: आरोग्यसेवेपर्यंत मर्यादित असलेल्या जगाच्या काही भागात. जागतिक क्षयरोग दिनामागील कारणे प्रखर व बहुआयामी आहेत. प्रामुख्याने, ते लोकांना जगभरातील समुदायांवर टीबीच्या विनाशकारी आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक प्रभावांबद्दल शिक्षित करते.
दरवर्षी लाखो लोक आजारी पडतात आणि लक्षणीय संख्येने आपला जीव गमावतात, या दिवसाचे उद्दिष्ट सतत कृती आणि समर्थनाची तातडीची गरज अधोरेखित करणे आहे. हा दिवस क्षयरोग विरुद्धच्या लढ्यात जागतिक एकतेला प्रोत्साहन देते, ही एक लढाई आहे जी आपण अजूनही लढत आहोत याची आठवण करून देते.
शिवाय, जागतिक क्षयरोग दिन हा कृतीसाठी जणू काही एक आवाहनच आहे. हे केवळ जागरुकता वाढवण्याबद्दल नाही तर प्रेरणादायी बदलाबद्दल देखील आहे.
झालेली प्रगती आणि उरलेल्या आव्हानांवर प्रकाश टाकून, हा दिवस सरकार,सामाजिक संस्था आणि व्यक्तींना क्षयरोग नियंत्रण आणि निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये काम करण्यास प्रवृत्त करतो. वचनबद्धतेची पुष्टी करण्याचा, नवनिर्मितीचा आणि टीबीमुक्त जगाकडे वाटचाल करण्याचा हा दिवस आहे.
धूमकेतू शूमाकर-लेव्ही-9
शूमाकर-लेव्ही-9 : कॅरोलिन, यूजीन एम. शूमेकर आणि डेव्हिड लेव्ही या खगोलशास्त्रज्ञांनी 24 मार्च 1993 मध्ये ह्या धूमकेतूचा शोध लावला. हा धूमकेतू जुलै 1994 मध्ये तुटून गुरू ग्रहावर आदळला. ही घटना फार विशेष होती कारण पृथ्वीच्या बाहेरील सौरमंडळातील वस्तू कशा एकमेकांवर आदळतात हे आपल्याला पहिल्यांदाच पाहता आले. प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा या खगोलीय घटनेचे मोठ्या प्रमाणात कव्हरेज झाले व ते लोकांनी आवडीने पाहिलेही.
हा धूमकेतू जगभरातील खगोलशास्त्रज्ञांनी काळजीपूर्वक पाहिला, त्यावर खूप अभ्यासही करण्यात आला. या धुमकेतूच्या गुरु ग्रहावर आदळल्यामुळे आपल्याला गुरू ग्रहाबद्दल नवीन माहिती मिळाली. शूमाकर-लेव्ही-9 धूमकेतूचे हे नाव त्याच्या शोधकर्त्यांच्या आडनावांमधून ठेवण्यात आले.
कॅलिफोर्नियातील पालोमार वेधशाळेत 40 सेंटीमीटर दुर्बिणीने टिपलेल्या चित्रात तो धुमकेतू कॅरोलिन, यूजीन एम. शूमेकर आणि डेव्हिड लेव्ही यांना सापडला. जेव्हा याचा शोध लागला तेव्हा हा धुमकेतू गुरू ग्रहाभोवती फिरत होता. एखाद्या ग्रहाभोवती फिरताना दिसणारा हा पहिला धूमकेतू होता. शास्त्रज्ञांना असे अंदाज लावले कि तो शोध लागण्यापूर्वी 20 ते 30 वर्षे गुरु ग्रहाभोवती फिरत असावा.
अभयासाअंती, असे दिसून आले की जुलै 1992 मध्ये गुरूच्या अधिक जवळ येण्यामुळे त्याचे तुकड्यांमध्ये विभाजन झाले. गुरूच्या गुरुत्वीय शक्तींनी धूमकेतूला वेगवगळ्या तुकड्यांमध्ये विखुरले. धूमकेतूला त्यानंतर 2 किमी व्यासाच्या तुकड्यात पाहण्यात आले होते, हे तुकडे 16 जुलै ते 22 जुलै 1994 दरम्यान गुरूच्या दक्षिण गोलार्धात आदळले. हे तुकडे अंदाजे 60 किमी/से वेगाने जात होते. ग्रेट रेडस्पॉटपेक्षाहि प्रभावाचे हे तुकडे अधिक सहजपणे दिसले.