25 मार्च दिनविशेष
25 march dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

25 मार्च दिनविशेष

जागतिक दिन :

  • गुलाम व्यापारातील बळींचा आंतरराष्ट्रीय स्मरण दिन (International Day of Remembrance of the Victims of Slavery and the Transatlantic Slave Trade )
  • न जन्मलेल्या बालकाचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of the Unborn Child)

25 मार्च दिनविशेष - घटना :

  • 1655 : क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनीचा सर्वात मोठा चंद्र, टायटन शोधला.
  • 1807 : गुलाम व्यापार कायद्याद्वारे ब्रिटीश साम्राज्यात गुलाम व्यापार बंद करण्यात आला.
  • 1885 : पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.
  • 1898 : शिवरामपंत परांजपे यांचे ‘काळ’ हे साप्ताहिक सुरू झाले.
  • 1929 : लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.
  • 1997 : जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे 27 वे सरन्यायाधीश म्हणुन पदभार स्वीकारला.
  • 2000: 17 वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळेने दक्षिण आफ्रिकेतील रॉबेन आयलंड बे (खाडी) पार केले. या खाडीत पोहणारी ती सर्वात तरुण जलतरणपटू आहे.
  • 2013 : मणिपूर उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.
  • 2013 : मेघालय उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.
  • वरील प्रमाणे 25 मार्च दिनविशेष | 25 march dinvishesh

25 मार्च दिनविशेष - जन्म :

  • 1932 : वसंत पुरुषोत्तम काळे ऊर्फ ‘व. पु. काळे’ – लेखक व कथाकथनकार यांचा जन्म.
  • 1933 : ‘वसंत गोवारीकर’ – शास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1937 : ‘टॉम मोनाघन’ – डॉमिनोज पिझ्झा चे निर्माते यांचा जन्म.
  • 1947 : सर ‘एल्ट्न जॉन इंग्लिश’ – संगीतकार व गायक यांचा जन्म.
  • 1956 : ‘मुकूल शिवपुत्र ग्वाल्हेर’ – घराण्याचे गायक यांचा जन्म
  • वरील प्रमाणे 25 मार्च दिनविशेष | 25 march dinvishesh

25 मार्च दिनविशेष
25 march dinvishesh
मृत्यू :

  • 1931 : ‘गणेश शंकर विद्यार्थी’ – भारतीय पत्रकार, राजकारणी व स्वतंत्रता आंदोलन कार्यकर्ता यांचे निधन. (जन्म: 26 ऑक्टोबर 1890)
  • 1940 : रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार, उपन्यास सम्राट यांचे निधन. (जन्म: 11 डिसेंबर 1867)
  • 1975 : ‘फैसल’ – सौदी अरेबियाचा राजा यांचे निधन.
  • 1991 : ‘वामनराव सडोलीकर’ – जयपूर अत्रौली घराण्याचे गायक यांचे निधन. (जन्म: 16 सप्टेंबर 1907)
  • 1993 : ‘मधुकर केचे’ – साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1932)
  • 2014 : भारतीय चित्रपट अभिनेत्री नंदा यांचे निधन. (जन्म: 8 जानेवारी 1939)

25 मार्च दिनविशेष
25 march dinvishesh
जागतिक दिन लेख :

गुलाम व्यापारातील बळींचा आंतरराष्ट्रीय स्मरण दिन

25 मार्च हा दिवस “आंतरराष्ट्रीय स्मरण दिन” म्हणून साजरा केला जातो. हा दिवस प्रथम 2008 साली साजरा करण्यात आला, 400 वर्षांहून अधिक काळ अमानुषपणे छळ झालेल्या जवळ-जवळ 15 दशलक्षाहून अधिक गुलामांना ज्यात पुरुष, महिला आणि मुले यांचेही बळी गेले होते त्यांना हा दिवस स्मरण आणि सन्मानित करतो.

“मानवाधिकारांचे इतिहासातील सर्वात वाईट उल्लंघन” गुलामांच्या व्यापारामुळे केले गेले असे आपल्याला इतिहासच सांगतो. गुलामांचा व्यापार हा जगातील सर्वात मोठा सक्तीचा क्रूर व्यापार होता. 400 वर्षांहून अधिक काळ, आफ्रिकन लोकांचे मोठ्या प्रमाणावर निर्गमन जगभरात अशा प्रकारे पसरले जे यापूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते किंवा मानवी इतिहासात नोंदवले गेले नव्हते. 1501 आणि 1830 च्या दरम्यान अमेरिकन लोकसंखेत युरोपियन लोकांपेक्षा आफ्रिकन लोकांची वाढ झाली.

16 व्या शतकात आणि 19 व्या शतका मध्ये, अंदाजे 15 ते 20 दशलक्ष लोकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध आफ्रिकेतून मध्य, दक्षिण, उत्तर अमेरिका, तसेच युरोपमध्ये नेण्यात आले. गुलामांचा व्यापार हा युरोप, अमेरिका आणि पश्चिम आफ्रिका यांच्यातील एक फायदेशीर व्यापार होता. त्याने ब्रिटनच्या बहुतेक समृद्धीचा पाया रचला.
1807 मध्ये गुलामांच्या व्यापारावर बंदी घालणारा कायदा स्थापित करणारा ब्रिटन हा पहिला देश होता आणि 1815 पर्यंत ब्रिटीशांनी नेदरलँड्स, स्पेन, फ्रान्स आणि पोर्तुगाल यांना त्याचे पालन करण्यास प्रवृत्त केले. गुलामांचा व्यापार अमेरिकेमध्ये सुमारे पाच वर्षांनंतर 1820 मध्ये बेकायदेशीर करण्यात आला आणि अखेरीस 1865 मध्ये तो रद्द करण्यात आला.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

25 मार्च रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 25 मार्च रोजी गुलाम व्यापारातील बळींचा आंतरराष्ट्रीय स्मरण दिन असतो.
मार्च दिनविशेष
सोमंबुगुशु
3031    1
23 45 678
9101112131415
16171819202122
23 242526272829
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज