26 मार्च दिनविशेष

26 मार्च दिनविशेष 26 march dinvishesh

आजचा दिनविशेष

जागतिक दिवस- घटना - जन्म - मृत्यू

26 मार्च दिनविशेष

26 मार्च दिनविशेष - जागतिक दिवस :

जागतिक पर्पल दिवस (World Purple Day)

26 March dinvishesh

26 मार्च दिनविशेष - घटना :

  • 1552 : गुरू अमर दास हे शिखांचे तिसरे गुरू बनले.
  • 1902 : नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे केंद्रीय मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.
  • 1910 : लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध मधील कुंडल रोडवर रेल्वे स्थानकाजवळ कारखाना उभारण्यास सुरूवात केली.
  • 1942 : ऑश्विझ छळछावणी (Concentration Camp) पोलंडमधील ओश्फिन्चिम ह्या शहराजवळ नाझी जर्मनीने उभारलेली एक मोठी छळछावणी होती येथे पहिल्या महिला कैदी दाखल झाल्या.
  • 1971 : बांगलादेशचा स्वातंत्र्यदिन
  • 1972 : नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पहिली जागतिक संस्कृत परिषद सुरू झाली.
  • 1974 : गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलन सुरू झाले.
  • 1979 : अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.
  • 2000 : व्लादिमीर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
  • 2013 : त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना.

26 मार्च दिनविशेष - जन्म :

  • 1874 : ‘रॉबर्ट फ्रॉस्ट’ – अमेरिकन कवी यांचा जन्म. (मृत्यू: 29 जानेवारी 1963)
  • 1875 : ‘सिंगमन र्‍ही’ – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 19 जुलै 1965)
  • 1879: ‘ओथमर अम्मांन’ (Othmar Hermann Ammann) – जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज चे रचनाकार ( यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 1965)
  • 1881 : ‘गुच्चियो गुच्ची’ – गुच्ची फॅशन कंपनी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 2 जानेवारी 1953)
  • 1898: ‘रुडॉल्फ दास्स्लेर’ – पुमा से कंपनी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 27 ऑक्टोबर 1974)
  • 1907 : ‘महादेवी वर्मा’ – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 11 सप्टेंबर 1987)
  • 1909 : बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर उर्फ ‘बा. द. सातोस्कर’ साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक यांचा जन्म. (मृत्यू: 27 नोव्हेंबर 2000)
  • 1930 : ‘सांड्रा डे ओ’कॉनोर’ – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश ( मृत्यू : 1 डिसेंबर 2023)
  • 1933 : ‘कुबेरनाथ राय’ – भारतीय लेखक व हिन्दी निबंधकार. ( मृत्यू: 5 जून 1996)
  • 1973 : ‘लॅरी पेज’ – गुगल चे सह-संस्थापक यांचा जन्म.
  • 1985 : ‘प्रॉस्पर उत्सेया’ – झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.

26 मार्च दिनविशेष - मृत्यू :

  • 1827 : ‘लुडविग व्हान बेथोव्हेन’ – अठराव्या शतकातील एक श्रेष्ठ व प्रभावी संगीतकार यांचे निधन. (जन्म: 16 डिसेंबर 1770)
  • 1885 : ‘अंसन स्तागेर’(Anson Stager) – वेस्टर्न युनियन चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 20 एप्रिल 1825)
  • 1932 : ‘हेनरी मार्टिन लेलैंड’ – कैडिलैक आणि लिंकन कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 16 फेब्रुवारी 1843)
  • 1945 : ‘डेविड लॉयड जॉर्ज’ – यूनाइटेड किंगडम चे प्रधानमंत्री यांचे निधन ( जन्म: 17 जानेवारी 1863)
  • 1996 : ‘के. के. हेब्बर’ – चित्रकार यांचे निधन.
  • 1996 : ‘डेव्हिड पॅकार्ड’ – हेल्वेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म: 7 सप्टेंबर 1912)
  • 1997 : ‘नवलमल फिरोदिया’ – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 9 सप्टेंबर 1910)
  • 1999: ‘आनंद शंकर’ – प्रयोगशील संगीतकार यांचे निधन. (जन्म: 11 डिसेंबर 1942)
  • 2003 : ‘हरेन पंड्या’ – गुजरातचे माजी गृह मंत्री यांची हत्या. (जन्म: 25 जून 1950)
  • 2008 : ‘बाबुराव बागूल’ – दलित साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 17 जुलै 1930)
  • 2009 : ‘ग्रिसेल्डा अल्वारेझ’ – मेक्सिकोतील पहिल्या महिला गव्हर्नर यांचे निधन (जन्म: 5 एप्रिल 1913)
  • 2012 : माणिकराव गोडघाटे ऊर्फ ‘ग्रेस‘ – प्रसिद्ध पराङमुख गीतकार व कवी यांचे निधन. (जन्म: 10 मे 1940)

ऑश्विझ छळछावणी

1942 : ऑश्विझ छळछावणी (Concentration Camp) पोलंडमधील ओश्फिन्चिम ह्या शहराजवळ नाझी जर्मनीने उभारलेली एक मोठी छळछावणी होती येथे पहिल्या महिला कैदी दाखल झाल्या. नाझी जर्मनीने पोलंडमधील ओशविसिम शहराजवळ बांधलेली हि एक खूप मोठी छळछावणी होती. छळछावणी  म्हणजे असे ठिकाण जिथे युद्धकैदी, जासूस, राजकीय विरोधक तसेच इतर लोके कैदी म्हणून ठेवण्यात येतात.

ऑश्विझ छळछावणीचे अवशेष आजही येथे जतन करून ठेवण्यात आले आहेत. या छळछावणीत शहिदांचे स्मारक आहे, येथे शेकडो ज्यू, युद्धकैदी, जासूस, तसेच राजकीय विरोधक ठेवण्यात आले होते. त्यांचा वापर प्रामुख्याने युद्धकाळात सामग्री उत्पादनासाठी मजूर म्हणून केला जात असे, जे श्रम करण्यास सक्षम होते त्यांनाच जिवंत ठेवले जात असे व इतर लोक विविध प्रकारे मारले जात असत हे छळछावणी म्हणजेचे एकप्रकारे मृत्यूचे ठिकाणच होते, या छळछावणी मध्ये गॅस चेंबरचे अवशेष जतन केलेले आहेत जेथे 11 लाख लोक मारले गेले .

जागतिक पर्पल दिवस World Purple Day :

दरवर्षी 26 मार्च रोजी जागतिक पर्पल डे साजरा केला जातो, पर्पल डे हा मेंदूच्या विकाराबद्दल लोकांना माहिती ह्वावी व या विकारांबद्दल ज्ञान वाढावे तसेच त्यांच्या सभोवताली असलेली भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी साजरा करण्यात येतो.

अमेरिकेमध्ये साधरण 35 लाखांपेक्षा अधिक लोकांना , एपिलेप्सीचे निदान झाले आहे आणि जगभरात 50 दशलक्षाहून अधिक लोक, एपिलेप्सीमुळे दैनंदिन आव्हाने समोर ठेऊन घेऊन कामे करतात. एपिलेप्सीचे योग्य निदान आणि योग्य उपचार केल्यास एपिलेप्सी सहजपणे दूर केली जाऊ शकते, म्हणून जागरूकता आणि संशोधन महत्त्वाचे आहे. आज समुदायामध्ये जागरूकता वाढवण्यासाठी तळागाळातील मोहिमेपैकी हा एक दिवस पाळला जातो.