3 मार्च दिनविशेष
3 march dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

3 मार्च दिनविशेष

जागतिक दिन :

  • जागतिक वन्यजीव दिन

3 मार्च दिनविशेष - घटना :

  • 1845: फ्लोरिडा हे अमेरिकेचे 27 वे राज्य बनले.
  • 1865: हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
  • 1885: अमेरिकन टेलिफोन आणि टेलिग्राफ कंपनी (AT&T) ची स्थापना झाली.
  • 1923: टाईम मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • 1938: सौदी अरेबियामध्ये तेलाचा शोध लागला.
  • 1966: डॉ. धनंजय राव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू बनले.
  • 1969: अपोलो कार्यक्रम: चंद्र मॉड्यूलची चाचणी घेण्यासाठी नासाने अपोलो-9 लाँच केले.
  • 2003: महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिलेल्या शरच्चंद्र चट्टोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
  • 2005: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर विमानातून ६७ तासांत जगाची एकट्याने, इंधन न भरता केलेली प्रदक्षिणा पूर्ण केली.
  • 2015: 20 डिसेंबर 2013 रोजी, संयुक्त राष्ट्रांनी ३ मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित केला.
  •  वरील प्रमाणे 3 मार्च दिनविशेष | 3 march dinvishesh

3 मार्च दिनविशेष - जन्म :

  • 1839: ‘जमशेदजी टाटा’ – टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू: 19 मे 1904)
  • 1845: ‘जॉर्ज कँटर’ – जर्मन गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 6 जानेवारी 1918)
  • 1847: ‘अॅलेक्झांडर ग्राहम बेल’ – टेलिफोनचा जनक यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑगस्ट 1922)
  • 1920: ‘मुकुंद शंकरराव किर्लोस्कर’ – किर्लोस्कर मासिकाचे संपादक यांचा जन्म.
  • 1923: ‘प्रा. सदाशिव नथोबा आठवले’ – इतिहासकार आणि ललित लेखक यांचा जन्म.
  • 1926: ‘रवि शंकर शर्मा’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 7 मार्च 2012)
  • 1928: ‘पुरुषोत्तम पाटील’ – कवी आणि लेखक यांचा जन्म.
  • 1948: ‘स्टीव्ह विल्हाइट’ – अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, GIF इमेज फॉरमॅटचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 14 मार्च 2022)
  • 1967: ‘शंकर महादेवन’ – गायक आणि संगीतकार यांचा जन्म.
  • 1977: ‘अभिजित कुंटे’ – भारताचा चौथा ग्रँडमास्टर यांचा जन्म.
  • 1987:’ श्रद्धा कपूर’ – भारतीय अभिनेत्री, गायिका आणि डिझायनर यांचा जन्म.
  • वरील प्रमाणे 3 मार्च दिनविशेष | 3 march dinvishesh

3 मार्च दिनविशेष
3 march dinvishesh
मृत्यू :

  • 1700: ‘छत्रपती राजाराम महाराज’ – मराठा साम्राज्याचे 3रे छत्रपती यांचे निधन (जन्म: 24 फेब्रुवारी 1670)
  • 1703: ‘रॉबर्ट हूक’ – इंग्लिश वैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 18 जुलै 1635)
  • 1707: ‘औरंगजेब’ – सहावा मोघल सम्राट यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1618)
  • 1919: ‘हरी नारायण आपटे’ – कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 8 मार्च 1864)
  • 1924: ‘वूड्रो विल्सन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे 28वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1965: ‘अमीरबाई कर्नाटकी’ – पार्श्वगायिका आणि अभिनेत्री यांचे निधन.
  • 1967: ‘स. गो. बर्वे’ – माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक यांचे निधन.
  • 1982: ‘रघुपती सहाय’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1896)
  • 1995: ‘पं. निखील घोष’ – तबलावादक यांचे निधन.
  • 2000: ‘रंजना देशमुख’ – मराठी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन.

3 मार्च दिनविशेष
3 march dinvishesh
जागतिक दिन लेख :

जागतिक वन्यजीव दिन

दरवर्षी 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन (World Wildlife Day) साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने 2013 मध्ये हा दिवस जाहीर केला आणि तो वन्यजीव संरक्षण, जैवविविधता आणि पर्यावरण संतुलन यासाठी महत्त्वाचा आहे.

वन्यजीव हे पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत. ते अन्नसाखळी, हवामान नियंत्रण आणि नैसर्गिक परिसंस्थेचे संतुलन राखण्यास मदत करतात. मात्र, वाढती लोकसंख्या, जंगलतोड, शिकार आणि हवामान बदलामुळे अनेक वन्य प्राणी आणि वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

या दिवसाचे उद्दिष्ट लोकांमध्ये वन्यजीव संरक्षणाची जागरूकता निर्माण करणे आणि त्यासाठी ठोस पावले उचलणे हे आहे. सरकार, संस्था आणि सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन वन्यजीव संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवेत.

“वन्यजीव वाचवा, पृथ्वी वाचवा” हा संदेश या दिवशी दिला जातो, कारण वन्यजीवांचे रक्षण करणे म्हणजे आपल्या भविष्यासाठी निसर्ग वाचवणे!

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

3 मार्च रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 3 मार्च रोजी जागतिक किशोरवयीन मानसिक आरोग्य दिन असतो.
मार्च दिनविशेष
सोमंबुगुशु
3031    1
23 45 678
9101112131415
16171819202122
23 242526272829
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज