8 मार्च दिनविशेष

8 मार्च दिनविशेष 8 March dinvishesh

आजचा दिनविशेष

जागतिक दिवस- घटना - जन्म - मृत्यू

8 मार्च दिनविशेष - जागतिक दिवस :

  • आंतरराष्ट्रीय महिला दिन
8 मार्च दिनविशेष

8 March dinvishesh

8 मार्च दिनविशेष - घटना :

  • 1817 : ‘न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज’ (NYSE) ची स्थापना.

  • 1942 : जपानने म्यानमारची राजधानी ‘रंगून’ ताब्यात घेतली.
  • 1948 : या दिवशी सर्व संस्थांचा भारतीय जिल्ह्यात समावेश करण्यात आला.
  • 1948: एअर इंडिया इंटरनॅशनलने परदेशात आपली सेवा सुरू केली.
  • 1948 : फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
  • 1957 : ‘घाना’ देश संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
  • 1974 : पॅरिस, फ्रान्समध्ये ‘चार्ल्स डी गॉल’ विमानतळ सुरू झाले
  • 1979 : फिलिप्स कंपनीने प्रथमच कॉम्पॅक्ट डिस्क सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केली.
  • 1993: दमानिया एअरवेज या खाजगी विमान कंपनीने आपल्या पहिल्या विमानाचे नाव ‘स्पिरिट ऑफ जेआरडी’ ठेवण्याचा निर्णय घेतला.
  • 1998: भारतीय क्रिकेट राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष ‘रमाकांत देसाई’ यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • 2009: भारतीय गोल्फपटूने थायलंड ओपनचे विजेतेपद पटकावले.
  • 2016: इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिकमधून संपूर्ण सूर्यग्रहण दृश्यमान आहे.
  • 1911: आंतरराष्ट्रीय महिला दिन प्रथमच साजरा करण्यात आला.

8 मार्च दिनविशेष - जन्म :

  • 1864: ‘हरी नारायण आपटे’ – मराठीतील जेष्ठ कादंबरीकार (मृत्यू: 3 मार्च 1919)
  • 1879: ‘ऑटो हान’ – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शात्रज्ञ (मृत्यू: 28 जुलै 1968)
  • 1889: ‘विश्वनाथ दास’ – ओडीसा चे माजी मुख्यमंत्री .
  • 1921: ‘अब्दूल हयी’ ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ –  शायर व गीतकार (मृत्यू: 25 आक्टोबर 1980)
  • 1928: ‘वसंत अनंत कुंभोजकर’ – कथालेखक.  
  • 1930: ‘चिंतामणी त्र्यंबक खानोलकर’ ऊर्फ ’आरती प्रभू’ – साहित्यिक (मृत्यू: 26 एप्रिल 1976)
  • 1931: ‘मनोहारी सिंग’ – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (मृत्यू: 13 जुलै 2010)
  • 1953: ‘वसुंधरा राजे सिंधिया’ – राजस्थान च्या माजी मुख्यमंत्री  यांचा जन्म.
  • 1954: ‘दिगंबर कामत’ – गोव्याचे माजी मुख्यमंत्री..
  • 1963: ‘गुरशरणसिंघ’, – भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • 1969: ‘उपेंद्र लिमये’ -मराठी चित्रपट अभिनेता .
  • 1974: ‘फरदीन खान’ – हिन्दी चित्रपट कलाकार
  • 1989: ‘हर्मंप्रीत कौर’ – भारतीय महिला क्रिकेटर 
  • 1886: ‘एडवर्ड कालव्हिन केन्डॉल’ – जीवरसायन शास्रज्ञ .

8 मार्च दिनविशेष - मृत्यू :

  • 1535: ‘कर्णावती’ – मेवाड ची राणी.
  • 1702: ‘विल्यम’ (तिसरा) – इंग्लंडचा राजा (जन्म: 14 नोव्हेंबर 1650)
  • 1942: ‘जोस रॉल कॅपाब्लांका’ – क्यूबाचा बुद्धीबळपटू (जन्म: 19 नोव्हेंबर 1888)
  • 1957: ‘बाळ गंगाधर’ तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्‍चायुक्त (जन्म: 24 ऑगस्ट 1888)
  • 1972: ‘तरुण बोस’ – भारतीय चित्रपट अभिनेता.
  • 1988: ‘अमरसिंग चमकिला’ – पंजाबी गायक.
  • 2009: गिरधारीलाल भार्गव – लोकसभेचे माजी सदस्य.
  • 2015: ‘विनोद मेहता’ – प्रसिद्ध पत्रकार तसेच आउटलुक चे संपादक.

8 March dinvishesh :

आंतरराष्ट्रीय महिला दिन

20 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अमेरिका आणि युरोपसह जवळजवळ संपूर्ण जगात महिलांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला होता. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये हजारो महिला कापड कामगार एका ऐतिहासिक निदर्शनासाठी रुटगर्स स्क्वेअरमध्ये जमले होते. त्यांनी दहा तासांचा कामाचा दिवस आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची मागणी केली. या दोन मागण्यांसोबतच लिंग, जात, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी यांचा विचार न करता सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा, अशीही जोरदार मागणी करण्यात आली.

अमेरिकन नोकरदार महिलांनी केलेल्या या व्यापक कृतीमुळे ‘क्लारा झेटकिन’ यांना खूप आनंद झाला. 1910 मध्ये कोपनहेगन येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ‘क्लारा झेटकिन’ यांनी 8 मार्च 1908 रोजी अमेरिकन महिला कामगारांच्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून ओळखला जावा असा ठराव संमत केला. युरोप, अमेरिका आणि इतर देशांमध्ये सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. परिणामी, 1918 मध्ये इंग्लंडमध्ये आणि 1919 मध्ये अमेरिकेत या मागण्या यशस्वी झाल्या.

भारतात पहिला महिला दिन 8 मार्च 1943 रोजी मुंबईत साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971 रोजी पुण्यात मोठा मोर्चा काढण्यात आला. नंतर, 1975 हे वर्ष UNO ने ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून घोषित केले. त्यानंतर महिलांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर आल्या. महिला संघटना मजबूत झाल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलले, महिला संघटनांच्या मागण्याही बदलल्या. आता बँका,महाविद्यालय व कार्यालयांमध्येही 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा होऊ लागला आहे. 

आंतरराष्ट्रीय महिला वर्ष 1975 च्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 1977 मध्ये, संयुक्त राष्ट्र संघ समितीने विविध सदस्यांना महिला हक्क आणि जागतिक शांततेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून 8 मार्च साजरा करण्याचे आवाहन केले.