आजचा दिनविशेष
Aajcha dinvishesh
12 मार्च दिनविशेष 12 march dinvishesh

आजचा जागतिक दिन :
- दांडी यात्रा दिवस
आजचा दिनविशेष - घटना :
- 1894 : कोका-कोला शीतपेय बाटली मध्ये भरून विक्रीस सुरवात.
- 1911 : कृष्णाजी प्र. खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग झाला.
- 1918 : रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.
- 1930 : महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी 200 मैलांची दांडी यात्रा सुरू केली.
- 1968 : मॉरिशसला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले
- 1992 : स्वातंत्र्याच्या 24 वर्षानंतर, मॉरिशस हे प्रजासत्ताक बनले आणि ब्रिटीश राजवटीच्या सर्व बेड्या फेकून दिल्या.
- 1993 : मुंबईत 12 बॉम्बस्फोटांच्या मालिकेत 300 हून अधिक लोक ठार आणि हजारो जखमी.
- 1999 : सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचे चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.
- 1999 : झेक प्रजासत्ताक, हंगेरी आणि पोलंड नाटोमध्ये सामील झाले.
- 2001 : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
- वरील प्रमाणे आजचा दिनविशेष | aajcha dinvishesh
आजचा दिनविशेष - जन्म :
- 1824 : ‘गुस्ताव रॉबर्ट किर्चहॉफ’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 17 ऑक्टोबर 1887)
- 1891 : नटवर्य ‘चिंतामणराव कोल्हटकर’ – अभिनेते आणि निर्माते यांचा जन्म.
- 1911 : ‘दयानंद बांदोडकर’ – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म. (जन्म: 12 ऑगस्ट 1973)
- 1913 : ‘यशवंतराव चव्हाण’ – भारताचे पाचवे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 25 नोव्हेंबर 1984)
- 1933 : ‘कविता विश्वनाथ नरवणे’ – लेखिका यांचा जन्म.
- 1931 : ‘हर्ब केल्हेर साउथवेस्ट’ – एअरलाईन्स चे सहसंस्थापक यांचा जन्म.
- 1969 : ‘फाल्गुनी पाठक’ – प्रसिध्द पार्श्वगायिका यांचा जन्म.
- 1984 : ‘श्रेया घोशाल’ – प्रसिध्द पार्श्वगायिका यांचा जन्म.
- वरील प्रमाणे आजचा दिनविशेष | aajcha dinvishesh
आजचा दिनविशेष
aajcha dinvishesh
मृत्यू :
- 1942: ‘रॉबर्ट बॉश’ – जर्मन अभियंते आणि उद्योजक यांचे निधन. (जन्म: 23 सप्टेंबर 1861)
- 1960 : ‘क्षितीमोहन सेन’ – भारतीय इतिहासकार यांचे निधन. (जन्म: 2 डिसेंबर 1880)
- 1999 : ‘यहुदी मेनुहिन’ – प्रसिध्द व्हायोलिनवादक आणि वाद्यवृंद संचालक यांचे निधन. (जन्म: 22 एप्रिल 1916)
- 2001 : ‘रॉबर्ट लुडलुम’ – अमेरिकन लेखक यांचे निधन. (जन्म: 25 मे 1927)
आजचा दिनविशेष
aajcha dinvishesh
जागतिक दिन लेख :
दांडी यात्रा दिवस
दांडी यात्रा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक क्षण होता. महात्मा गांधींनी 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून दांडीकडे हे 240 मैलांचे लांब पदयात्रा आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा उद्देश ब्रिटिश सरकारच्या मीठ उत्पादनावरील अन्यायकारक कराविरोधात निदर्शने करणे हा होता.
गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी 6 एप्रिल 1930 रोजी दांडी येथे पोहोचून समुद्रकिनाऱ्यावर मीठ तयार करून इंग्रजांविरुद्ध सत्याग्रह केला. या अहिंसक आंदोलनामुळे भारतभर स्वातंत्र्याच्या चळवळीला नवीन ऊर्जा मिळाली आणि ब्रिटीश सत्तेविरुद्ध जनमत उभे राहिले.
दांडी यात्रा दिवस हा भारतात 12 मार्चला साजरा केला जातो. हा दिवस लोकशाही, स्वातंत्र्य आणि सत्याग्रहाच्या तत्त्वांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोठी चालना मिळाली आणि शेवटी 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. दांडी यात्रेने अहिंसक संघर्षाची ताकद दाखवली आणि जगभर प्रेरणा दिली.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
12 मार्च रोजी जागतिक दिन कोणते ?
- 12 मार्च रोजी दांडी यात्रा दिवस असतो.

