7 मार्च दिनविशेष
7 मार्च दिनविशेष 7 March dinvishesh
आजचा दिनविशेष
जागतिक दिवस- घटना - जन्म - मृत्यू
7 March dinvishesh
7 मार्च दिनविशेष - घटना :
- 1771 : हैदर आणि मराठे यांच्यात मोती तलावाची लढाई झाली.
- 1876 : “अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल” यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले.
- 1936 : संदर्भ दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्हाईनलँडमधे सैन्य घुसवले.
- 2006 : लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.
- 2009 : केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.
7 मार्च दिनविशेष - जन्म :
- 1508 : “हुमायून” – दुसरा मुघल सम्राट (मृत्यू: 17 जानेवारी 1556)
- 1765 : फोटोग्राफी चे शोधक “निसेफोरे नाऐप्से” यांचा जन्म. (मृत्यू: जुलै 1833)
- 1792 : ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक सर “जॉन विल्यम हरर्षेल” यांचा जन्म. (मृत्यू: 11 मे 1871)
- 1849 : महान वनस्पतीतज्ञ “ल्यूथर बरबँक” यांचा जन्म. (मृत्यू: 11 एप्रिल 1926)
- 1911 : ज्ञानपीठ पुरस्कार विजिते आधुनिक हिंदी साहित्यिक आणि वृत्तपत्रकार “सच्चिदानंद हिराचंद वात्सायन” यांचा जन्म. (मृत्यू: 4 एप्रिल 1987 )
- 1918 : मराठी साहित्यिक “स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर” यांचा जन्म.
- 1934 : भारताचा यष्टिरक्षक “नरी कॉन्ट्रॅक्टर” यांचा जन्म.
- 1942 : भारतीय क्रिकेटपटू “उमेश कुलकर्णी” यांचा जन्म.
- 1952 : वेस्ट इंडियन क्रिकेटपटू “व्हिव्हियन रिचर्डस” यांचा जन्म.
- 1955 : चित्रपट अभिनेते “अनुपम खेर” यांचा जन्म.
7 मार्च दिनविशेष - मृत्यू :
- 1647 : छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू “दादोजी कोंडदेव” यांचे निधन.
- 1922 : रंगभूमी नट “गणपतराव जोशी” यांचे निधन. (जन्म: 15 ऑगस्ट 1867)
- 1952 : तत्वज्ञ “परमहंस योगानंद” यांचे निधन.
- 1961 : भारतरत्न पंडित गोविंदवल्लभ पंत यांचे निधन. (जन्म: 10 सप्टेंबर 1887)
- 1974 : माजी अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी यांचे निधन.